सातारा | महाराष्ट्र राज्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या यात्रा नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा कालावधीत शिंगणापुरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे श्री शंभू महादेवाची यात्रा 17 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान होणार होती. मात्र शासनाच्या निर्देशानुसार वार्षिक चैत्र यात्रा यात्रा रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी कडक निर्णय राबवणार असल्याचे प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी उपस्थितांना सांगितले. यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकणासह राज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतात. परंतु कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने यात्रेवर प्रतिबंध जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वार्षिक यात्रा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. यात्रेतील सर्व धार्मिक विधी स्थानिक सेवाधारी, मानकर्यांनी करण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत.
शिंगणापुरमध्ये यात्रा कालावधीत बाहेरून येणाऱ्या भाविकांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. यात्रा काळात शिंगणापूर गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. यात्रा कालावधीत शिंगणापुरात जमावबंदी आदेश करण्यात आला आहे. भाविकांना रोखण्यासाठी शिंगणापूर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group