शिल्पा आणि राज कुंद्राने दिले लेकाला बर्थडे गिफ्ट; पहाल तर तुम्हीही म्हणाल, सो क्युट..!

0
42
Shilpa Shetty- Kundra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचा मुलगा वियान याचा काल ९ वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेकांनी भरभरून शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादही दिले. शिल्पा आणि राजनेही लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याचबरोबर त्याला आवडेल असे एक मस्त गिफ्टही दिले आहे. हे गिफ्ट साधे सुधे नाहीये. जिवंत आणि खरेखुरे आहे. शिल्पा आणि राजने वियानला चक्क कुत्र्याचे छोटे पिल्लू गिफ्ट म्हणून दिले आहे. शिल्पाने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत हि बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CPIK42-BKX5/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या घरात कालच एक नवीन आणि छोटुसा पाहुणा आला आहे. हा पाहुणा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून चक्‍क एक कुत्र्याचे छोटुसे पिल्लू आहे. हे पिल्लू वियानला भेट देत असतानाचा एक व्हिडिओ शिल्पाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. हे वियानसाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त विशेष असे एक सरप्राईज होते. यासाठी वियानला डोळे बंद करायला सांगितले होते आणि शिल्पाने कुत्र्याचे पिल्लू वियानच्या हातात अगदीच अलगद सोपवले.

https://www.instagram.com/p/CPHwtC2hVCT/?utm_source=ig_web_copy_link

वियान हे कुत्र्याचे पिल्लू बघून अगदी भारावून गेला होता. शिल्पाने या कुत्र्याच्या पिल्लाचे नाव ‘ट्रफल’ असे ठेवले आहे. यानंतर वियानने आणखी एक कुत्र्याचे पिल्लू मागितले आहे. मात्र १० व्या वाढदिवशी त्याला हे गिफ्ट मिळेल, असे आश्‍वासन शिल्पा आणि तिच्या पतीने त्याला दिले असल्याचे शिल्पाने सांगितले. वियानच्या वाढदिवसानिमित्ता शिल्पाने वियानच्या चौथ्या वाढदिवसाच्या वेळचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेल्यावर्षी शिल्पाने एका कन्येला जन्म दिला आहे. तिचे नाव समिषा ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here