मोदी सरकारमध्ये शिंदे- दादा गटाकडून कोणाकोणाला मंत्रीपदे? पहा संभाव्य यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणुकीत भाजपप्रणीत NDA ला स्पष्ट बहुमत मिळाल्याने देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित झालं आहे. NDA ला २९१ जागांवर बहुमत मिळाले असून NDA ने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. परवा म्हणजेच ९ जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला आणि अजितदादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला सुद्धा वाटा मिळणार आहे. एकनाथ शिंदेंना २ तर अजित पवारांना १ मंत्रिपद मिळेल असं बोललं जात आहे.

यंदा भाजप स्वबळावळ फक्त २४० जागा जिंकू शकल्याने मित्रपक्षांची सोबत भाजपसाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे मित्रपक्षांना योग्य तो सन्मान राखण्यासाठी भाजपला काही मंत्रिपदाचा त्याग करावा लागणार असून मित्रपक्षांच्या वाट्याला काही मंत्रीपदे द्यावी लागतील. त्यानुसार भाजपने मित्रपक्षांसाठी प्रत्येकी ४ जागांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंच्याकडे ७ खासदारांचे बळ असलयाने त्यांना किमान २ मंत्रीपदे देण्यात येतील तर अजितदादांकडे एकमेव खासदार असला तरी त्यांना मंत्रिपद मिळू शकते.

शिंदे गटाकडून कोणाला मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

श्रीकांत शिंदे
संदीपान भुमरे
धैर्यशील माने
प्रतापराव चिखलीकर
श्रीरंग बारणे

अजितदादा गटाकडून कोणती नावे चर्चेत

प्रफुल्ल पटेल
सुनील तटकरे

दरम्यान, सत्तास्थापनेत किंगमेकर ठरलेले नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन्ही नेते स्वतःकडे महत्वाची खाती मागत आहेत. चंद्राबाबू नायडू ३ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री मागत असल्याची बातमी समोर आली होती. तसेच लोकसभा अध्यक्षपद सुद्धा स्वतःकडे ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तर नितीशकुमार यांनीही महत्वाची खाती मागितली असल्याच्या चर्चा होत्या. तसेच अग्निवीर योजनेतील उणिवा दूर करण्याची मागणी सुद्धा JDU कडून करण्यात आली आहे. आता मोदी या दोन्ही नेत्यांच्या किती मागण्या पूर्ण करतात ते पाहायला हवं.