हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे- फडणवीस सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत तब्बल २८ निर्णय घेत शिंदे फडणवीस सरकारने कामाचा धडाका लावला आहे. या बैठकीत वर्सोवा- वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाचे नामांतर करण्यात आलं आहे. या दोन्ही रस्त्यांना अनुक्रमे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ आणि अटलबिहारी वाजपेयी यांची नावे देण्यात आली आहेत.
मंत्रिमंडळ बैठक कोणकोणते निर्णय घेण्यात आले-
1) वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव देण्यात आलं आहे.
2) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव देण्यात आलं आहे.
3) राज्यात 700 ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरु होणार असून यासाठी २१० कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली.
4) भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. यामुळे ३ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ
5) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. या योजनांतर्गत २ कोटी कार्ड वाटणार तसेच आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार
6) संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.
👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय :
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2023
7) आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार
8) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश
9) मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे उभारणार. त्यासाठी 100 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
10) पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 कि.मी.च्या नद्यांमधील गाळ काढणार
11) मुंबई मेट्रो- 3 मार्गासाठी धारावीचा भुखंड वापरण्यात येणार
12) भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
13) मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
14) राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
15) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन; पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
16) बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
17) जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 3552 कोटी खर्चास मान्यता
18) राज्यात 9 ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये उभारणार. त्यासाठी 4365 कोटी खर्चास मान्यता
19) बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
20) दीनदयाळ अंत्योदय योजना आता 143 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविणार
21) दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. 12 लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
22) देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
२३) चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
24) सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
25) गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
26) ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
27) पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारी करणाऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
28) पर्यटन उपविभागासाठी उप सचिव