प्रा. शिंदे खून प्रकरण: ‘त्याने’ दिली होती आत्महत्येची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रा. राजन शिंदे खून प्रकरणात त्यांची हत्या करणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकाने सुरुवातीला, ‘तुम्ही सारखी सारखी चौकशी केल्यास आत्महत्या करून सुसाईड नोटमध्ये तुमची नावून नावे लिहून ठेवीन’ अशी धमकी गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांना दिल्याची बाब समोर आली आहे. यामुळेच आधी सर्व पुरावे गोळा करायचे आणि नंतरच त्याची चौकशी करायची अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्याने’ चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आणि लपवून ठेवलेले शस्त्रे आणि वस्तू विहिरी टाकल्याचे सांगितले. या वस्तू जप्त केल्यावर सोमवारी त्याला ताब्यात घेतले आणि बाल न्याय मंडळ यांच्या आदेशानुसार त्याची रवानगी बालसुधारगृहात केली. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव आणि अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत संयम ठेवून या संवेदनशील हत्येचा उलगडा केला. घटनेनंतर काही तासांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने ‘तुमच्याकडे काय पुरावा आहे, मी अल्पवयीन आहे. तुम्ही अशी चौकशी करू शकत नाही’ असे बजावले होते.

प्रा. शिंदे आणि या विधिसंघर्षग्रस्त बालकांमध्ये कधी अभ्यास तर कधी लहान मोठ्या कारणांवरुन खटके उडायचे. यातूनच हे कृत्य केल्याचे नातेवाईकांना समजले. नातेवाईकांनीही खरे सांगण्यासाठी त्या बालकावर दबाव टाकला होता.

Leave a Comment