मुंबईहून शिराळ्याला आलेले पती पत्नी सापडले कोरोना पॉझिटिव्ह; सांगलीत सध्या १८ रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शिराळा तालुक्यातील निगडीमध्ये मुंबईहून आलेले पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज तपासणीत स्पष्ट झाले. मुंबईतून आलेला त्या कुटुंबाला गावांमध्ये घेतले नसल्याने जांभुळवाडीत संस्था क्वॉरंटाईन केले होते. तेथे त्रास होऊ लागल्याने त्यांना मिरजेतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर दोघेही पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 18 झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

मुंबईमधून आपापल्या गावाकडे जाण्याची सरकारने परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात लोक जिल्ह्यात येत आहेत. निगडीमध्ये मुंबईहून 14 मे रोजी एका कुटुंबातील पाच जण आले होते. निगडीमध्ये यापूर्वी मुंबईतून आलेल्या तरुणी आणि तिच्या आईला कोरोना झाला होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. सध्या त्या दोघी कोरोना मुक्त झाल्या असल्या तरी दक्षतेचा उपाय म्हणून बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश दिला जात नाही. मात्र मुंबईतून पती-पत्नी, मुलगा, मुलगी आणि मेहुणी असे पाच जण निगडीमध्ये आले होते. मुंबईतून आलेला त्या कुटुंबाला गावांमध्ये घेतले नसल्याने जांभुळवाडीत संस्था क्वॉरंटाईन केले होते. तेथे त्रास होऊ लागल्याने त्यांना मिरजेतील कोविड-19 रुग्णालयात शनिवारी हलविण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर पती-पत्नी दोघांचाही अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, त्यांच्यासोबत आलेल्या मुलगा, मुलगी आणि मेहुणी यांनाही मिरजेत संस्था क्वॉरंटाईन केले असून त्यांचेही कोरोनाच्या तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 52 रुग्ण आढळले आहेत, त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 32 जण कोरोनामुक्त रुग्ण झाले होते. रविवारी सांगलीतील महसूल कॉलनीमधील त्या तरुणानेही कोरोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात 18 कोरोनाचे रुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment