पठ्ठ्या शर्टलेस होऊन चक्क पोलिसांच्या गाडीवर चढला, खतरनाक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल

viral video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तुम्ही आजपर्यंत कार आणि बाईकवरील तरुणांचे स्टंटचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पहिले असतील. ज्यांना रोखण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असतात. मात्र हैदराबादमधून एक असा व्हिडिओ (Viral Video)समोर आला आहे तो पाहून तुम्ही हैराण व्हाल. कारण इथे एक तरुण चालत्या पोलिसांच्या गाडीच्या छतावर चढून स्टंट करताना दिसत आहे. तो माणूस दारूच्या नशेत होता असा संशय आहे आणि त्याने शर्टही घातला नव्हता असे दिसत आहे. ही घटना सोमवारी रात्री आसिफ नगरमध्ये घडली आहे. या व्यक्तीचे वय 20 वर्षे आहे.

पोलिसांच्या वाहनावर बेकायदेशीरपणे हैदोस घालणारा तरुण 20 वर्षांचा असून तो रोजंदारीवर काम करतो आणि मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. तो पोलिसांच्या चालत्या गस्तीच्या गाडीवर चढला आणि मद्यधुंद अवस्थेत त्याने एवढेच नाही तर सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले. या आरोपीचे नाव अजय असे आहे. त्याला अनेक आरोपांत अटक करून मंगळवारी तुरुंगात पाठवण्यात आले.

मद्यपान केलेला व्यक्ती शर्टशिवाय पोलिसांच्या गस्तीच्या वाहनावर (Viral Video) बसलेला दिसतो. गाडी वेगाने जात आहे. चालकाने ब्रेक लावताच तो तरुण घसरला आणि गाडीच्या बोनेटवर आला. कारच्या बोनेटवरही त्याच्या पावलांचे ठसे पाहायला मिळतात. एवढेच नाही तर व्हिडीओग्राफरने (Viral Video) वाहनाची मागील विंडशील्डही तुटलेली दाखवली आहे. हा व्हिडिओ ट्विटर वरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
कोरोना वाढतोय!! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ

अलिबागमध्ये PNP नाट्यगृहाला लागली आग, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

भाजपचे खासदार संजय काका राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या गाडीत

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भर बाजारात पाण्याच्या टँकरने जमावाला चिरडले