कर्नाटकातील रणधीरा पडे या संघटनेवर कायमची बंदी घालण्याची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली ।  कर्नाटकातील रणधीरा पडे या संघटनेवर कायमची बंदी घालून या संघटनेला आर्थिक रसद पुरवणार्‍या घटकांची चौकशी करावी. तसेच या घटनेमागे असणार्‍या मास्टर माइंड चा शोध घ्यावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्याकडे केली आहे. बंगळूर येथे झालेल्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज मुर्ती विटंबनाच्या पाश्र्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी भेट घेतली.

चौगुले म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे मार्गदर्शक, प्रेरणास्रोत, ऊर्जास्त्रोत असून संपूर्ण देशवासीयांचे आराध्य दैवत आहेत. अशा युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विटंबना होते हे अत्यंत खेदजनक बाब आहे. काही विकृत लोकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विटंबना केली असून अशा नीच प्रवृत्तीला वेळीच ठेचने आवश्यक आहे. रणधीरा पडे या संघटनेवर कायमची बंदी घालून या संघटनेला आर्थिक रसद पुरवणार्‍या घटकांची चौकशी करावी.

तसेच या घटनेमागे असणार्‍या मास्टर माइंड चा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जमखंडीचे आमदार आनंदा न्यामगौडा, सांगली जि.प. सदस्य तमनगोंडा रवी पाटील, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य विशाल गायकवाड, श्रीधर घसारी, सचिन मोहिते, प्रशांत गायकवाड, पै. मोहन शिंदे, भूषण गुरव आदी उपस्थित होते.

Leave a Comment