नाशिक | नाशिक येथे भाजपाच्या कार्यालवर दगडफेक करण्यात आलेली आहे. या दगडफेकीत कार्यालयाची तोडफोड झाली आहे. नाशिक, पुणे व महाड, त्यानंतर आैरंगाबाद येथे नारायण राणेंवर गुन्हा दाखल झालेली आहे. तर सांगलीत पोस्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्तेही समोर येवू लागले आहेत.
नाशिक येथे भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी महाराज की जय, शिवसेनेचा विजय असो, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिलेल्या आहेत. यामुळे शिवसैनिक व युवा सैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येवू लागले आहेत.
नाशिक येथे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते सुधाकर यांनी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर अटकेची तांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात गुन्हे दाखल करण्यात येत असून आता दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली आहे. नाशिक नंतर सांगलीमध्येही शिवसैनिक आक्रमक झालेले असल्याचे पहायला मिळाले आहे.