पंतप्रधान मोदींना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Shiv Sanmna Puraskar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा शिव सन्मान पुरस्कार (Shiv Sanman Puraskar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी साताऱ्याला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज खासदार छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे.

येत्या 19 फेब्रुवारी रोजी सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे शिव सन्मान पुरस्कार सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या भव्य पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहतील. तसेच पंतप्रधान मोदी देखील साताऱ्याला येणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आज x वर ट्विट करत उदयनराजे भोसले यांनी भव्य सोहळ्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे.

आपल्या ट्विटमध्ये उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की “राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणार मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर दि. 19 फेब्रुवारी शिवजयंतीदिनी गौरवपूर्ण प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या जागेची आज पाहणी केली”

दरम्यान, भारताच्या विकासासाठी मोदी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवताना दिसत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे लोकप्रिय नेते बनले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीमुळे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातून अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना शिव सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.