शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती; राज्याच्या राजकारणाचा नवा अध्याय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेनं आता संभाजी ब्रिगेडशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाही आणि प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी ही युती करण्यात आली आहे अस संभाजी ब्रिगेडने म्हंटल आहे. त्यामुळे आगामी निवडणूका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित लढणार आहेत.

मुंबईत आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना एकत्र येण गरजेच असल्याचे संभाजी बिग्रेडच्या प्रमुख प्रवक्त्याने म्हटले आहे.

Uddhav Thackeray यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; पहा LIVE

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या नव्या युतीचे स्वागत केलं आहे. शिवप्रेमी असल्याने आपलं रक्त एकच आहे. सध्या आमच्याकडे काही नसताना सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटतं असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असंही ठाकरे म्हणाले.