हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकते का असा प्रश्न पडला असताना भाजप खासदार गिरीश बापट यांनी युतीबाबत आशा व्यक्त केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे, असं मत गिरीश बापट यांनी मांडले.
बापट म्हणाले, अनैसर्गिक लोकांमूळे आमची तुटली होती, भविष्यात युती होऊ शकते, आम्हाला त्याचा आनंद होईल. प्रताप सरनाईक आत्ता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होत असतांना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचाय.” असे सांगितले. पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे. महापालिकेत शिवसेना भाजपा युती होऊ शकते असेही खासदार गिरीश बापट म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला. बापट म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत आमचं प्राध्यान राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.