हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढेल अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत भाष्य केले होते. आता जयंत पाटील यांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळल्याने आता राष्ट्रवादी आणि शिवसेना ही नवी आघाडी राज्यात उदयास येते का हे पाहणं महत्त्वाचे आहे.
जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. या 3 पक्षांनी एकत्र राहावं याला सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. त्या दृष्टीने सामनाने मत व्यक्त केल्याचं दिसत आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार –
संजय राऊत म्हणाले, भाजप आणि काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही?? महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र लढावं लागेल. आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात नक्कीच चमत्कार होईल,” असं राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.