हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराचा धुरळा चांगलाच उडत आहे. आज शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी नांदेड- इंधन दरवाढ, कोरोनात आलेले अपयश आणि अच्छे दिनाच्या स्वप्नांचा झालेला चुराडा याचे अपयश झाकण्यासाठी विरोधी पक्षाकडून दररोज कथित घोटाळे काढले जात आहेत. सध्या विराेधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झाली आहे, असा शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी भाजपला टोला लगाविला.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आता राज्य सरकार अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करीत आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधींची मदत हि भाजपला फुटकी कवडी वाटते याचे आश्चर्य आहे. इंधनाच्या किमंती भयावह वाढल्या आहेत. केंद्राने अद्याप जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
सध्याच्या काळात केंद्र सरकार बद्दल जनतेत खूप आक्रोश आहे. परंतु अपयश झाकण्यासाठी दररोज बर्निंग ट्रेनसारखे आरोप करीत सुटायचे हेच काम सुरु आहे. भाजपाचे नेते शिवसेनेचे आमदार खिशात असल्याचे सांगत सुटले आहेत. परंतु यांच्या खिशात केवळ काडीपेटी आहे. काडी टाकायची, आग लागली तर उत्तम नाही तर निघनाऱ्या धूरामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायची असा यांचा एजेंडा विरोधकांचा असल्याचा आरोप गोऱ्हे यांनी केला आहे.