सोलापूर: हॅलो महाराष्ट्र – दसऱ्या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यंदा दोन दसरे मेळावे होणार आहेत. उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसैनिकांना संबोधणार आहेत. या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिंदे गटाचे आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यावरूनच या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी शिवसेनेवर टीका करत ठाकरेंचा मेळावा हा राष्ट्रवादीला आंदण दिल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसीवरील दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून 30 ते 35 हजार शिवसैनिक जाणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला आंदण दिला असल्याची टीका शहाजीबापूंनी (shahaji bapu patil) केली आहे. उद्या होणाऱ्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असणार आहे तर बीकेसीवर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे आमचा मेळावा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा दावा शहाजीबापूंकडून (shahaji bapu patil) करण्यात आला आहे.
त्यामुळे आता शहाजीबापूंच्या (shahaji bapu patil) टीकेला शिवसेना काय उत्तर देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. दादर शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!