हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राम मंदिर ट्रस्टने केलेल्या घोटाळ्याबाबत राजकीय नेत्याकडूनही टीका टिप्पणी होऊ लागली आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घोटाळ्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरत ‘आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर भाजपचे आमदार राम कदम यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “काँग्रेसने राम मंदिराच्या विरोधात २२ वकील लावले होते. आता त्यांच्या मांडीला मंडी लावून शिवसेना बसली आहे. त्यामुळे हिंदुत्व व राम मंदिराबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही,” असे कदम यांनी म्हंटल आहे.
सोमवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिल्याचे म्हंटले होते. राऊत यांच्या या माहितीनंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे कि, “शिवसेना राममंदिर तथा हिंदुत्व के बारे में बोलने का नैतिक अधिकार खो चुकी है.. पाक परस्त लोगों के साथ सत्ता साझा करने वाली शिवसेना अपना हिन्दुत्व त्याग चुकी है.”
#शिवसेना #राममंदिर तथा हिंदुत्व के बारे में बोलने का नैतिक अधिकार खो चुकी है..
पाक परस्त लोगों के साथ सत्ता साझा करने वाली शिवसेना अपना हिन्दुत्व त्याग चुकी है.
— Ram Kadam (@ramkadam) June 14, 2021
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मागणीबद्दल भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विटद्वारे मत व्यक्त केलं आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केले आहेत. सिह यांच्या आरोपानंतर या प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी याबाबत खुलासा करावा तसेच याप्रकरणी उत्तर द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.