‘या’ तालुक्यात शिवसेना राष्ट्रवादीवर भारी; शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकिंचा निकाल आज जाहीर होत आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीही आमने सामने असल्याचे पहायला मिळाले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातही शिवसेना राष्ट्रवादीवर भारी पडल्याचं पहायला मिळालं. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट झाली आहे.

पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गटाच्या पॅनेलने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. तर विरोधी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. मंत्री देसाई यांच्या स्थानिक गटाने आतापर्यंत पाटण तालुक्यातील २० ग्रामपंचातींवर वर्चस्व मिळवित सत्ता मिळविली आहे. तर विरोधी राष्ट्रवादीच्या गटाची केवळ सातच ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. पाटण तालुक्यात १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया झाली. यामध्ये ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात ७२ ग्रामपंचायतीत निवडणूक झाली.

https://t.co/odT6yryn2c?amp=1

यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गटाची सत्ता आलेल्या ग्रामपंचायती : मुळगांव, कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण, पेठ शिवापूर, चोपडी, त्रिपुडी, शिंदेवाडी, सोनवडे, वाटोळे, हुंबरळी, चोपदारवाडी, मणदुरे, आंबळे, वाडीकोतावडे, धावडे, दिवशी खुर्द, कातवडी, मुंद्रुळहवेली, ठोमसे, आंबळे.

https://t.co/G5kcUA5uqq?amp=1

राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाची सत्ता आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये काळोली , मेंढेघर , तामकडे , नेचल, सुळेवाडी, मेंढोशी, चिटेघर, या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अद्याप काही ग्रामपंचायचतींचा निकाल जाहीर झालेला नाही. पण सध्यातरी २० ग्रामपंचायतींवर मंत्री देसाई यांच्या स्थानिक गटांची सत्ता आली आहे.

https://t.co/L7V4q5ZIA7?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.