व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पोलीस आयुक्तांना शहरात काय चाललंय याची खबर नसते- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

 

 

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. याच वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तालयात तिन्ही पोलीस उपयुक्त यांची भेट घेऊन गुन्हेगारीवर आळा कसा घालता येईल यावर चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तथा आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या वेळी त्यांनी पोलीस अयुक्त यांना शहरातील पोलीस ठाण्यात काय चाललय याची माहिती नसते असा आरोप प्रसारमध्यमात केला.

 

बैठक झाल्यावर बोलताना शिवसेना नेते खैरे म्हणाले की, राज्यात आमचे सरकार आहे त्यामुळे गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आम्ही पोलिसांसोबत विविध विषयांवर चर्चा केली त्यामध्ये आम्ही पोलिसांना काही उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे त्यामध्ये आगामी काळात सुरु होणारे महाविद्यालय शाळा अशा ठिकाणी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी दामिनी पथकाची संख्या वाढून त्यांना विशेष अधिकार देण्यात यावेत तसेच शाळा महाविद्यालय किंवा बाजारात जाताना अनेक महिला खाजगी रिक्षाने जातात रिक्षातील गाण्यांचा आवाज जास्त असलेल्या रिक्षाचालकांवर योग्य कारवाई करावी. तसेच शाळा महाविद्यालय परिसरात कुठलेही खाजगी कॅफे नसावे त्या परिसरामध्ये फक्त त्या शाळेची किंवा महाविद्यालयाची अधिकृत कॅन्टीन असावी अशा सूचना आम्ही पोलिसांना केल्याचे खैरे यांनी सांगितले.

 

शहरातील अवैध दनसे खोरा मुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे खैरे यांनी यावेळी सांगितले सहज रित्या उपलब्ध होणाऱ्या नशेच्या गोळ्या यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन विविध प्रकारचे गुन्हे करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी ऑनलाइन येणाऱ्या सहित यांवर लक्ष ठेवून अशा प्रकारे अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करावी जेणेकरून आगामी काळात शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.तर औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांना शहरातील पोलिस ठण्यात काय चालतय याची माहितीच नसते, त्यांना जि माहिती दिली जाते त्यालाच ते सत्य मानतात. असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.