हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दशकापासून काँग्रेससोबत असलेल्या काँग्रेस आणि पक्षातील जी-23 या नेत्यांच्या समुहातील प्रमुख नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून पक्षाकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. 16 मे रोजीच आपला राजीनामा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती सिब्बल यांनी दिली.
गेल्या काही दिवसापासून काँग्रेस पक्षातील बढया नेत्यांकडून पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले जात आहेत. दरम्यान आता सिब्बल यांनी देखील पक्ष सदस्यत्वचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाने डिंपल यादव, जावेद अली खान आणि कपिल सिब्बल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कपिल सिब्बल हे उत्तर प्रदेशमधून काँग्रेसच्या कोट्यातून खासदार आहेत. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोनच उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे सिब्बलयांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी इतर मार्गांची चाचपणी केली असल्याची चर्चा सुरू होती. कपिल सिबल हे राजकारणासोबत एक कायदेतज्ज्ञदेखील आहेत. अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी सु्प्रीम कोर्टात लढवले आहेत. सिब्बल यांनी समाजवादी पक्षासह राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू होती. या तिन्ही पक्षांच्या महत्त्वांच्या नेत्यांचे खटले सिब्बल यांच्याकडे आहेत.