व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नारायण राणेंचे वर्तन दुतोंडी सापासारखे; नीलम गोऱ्हेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून शिवसेनेवर केल्या जात असलेल्या टीकेनंतर शिवसेनेतील नेत्यांनीही आक्रमक पावित्रा घेतला आहे. यांच्याकडूनही राणेंवर घणाघाती टीका केली जात आहे. मंत्री राणेंनी एकनाथ शिंदे यांच्या भाजपबाबतच्या चर्चेमध्ये नीलम गोऱ्हे यांचेही नाव घेतल्यानंतर आज शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राणे यांच्यावर टीका केली. “एकीकडे बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त करायचा आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंविषयी गरळ ओकायची, असे हे राणे दुतोंडी साप आहेत, अशी टीका गोऱ्हे यांनी केली आहे.

भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेवेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले होते की, शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेला कंटाळलेले आहेत. ते नुसते शिपुरते शिवसेनेत आहेत. त्यांना वेळ पडली तर भाजपमध्ये घेतले जाईल. यावेळी राणेंनी नीलम गोऱ्हे यांच्याबद्दलही माहिती दिली होती. गोऱ्हेबद्दल बोलताना राणे म्हणाले होते की त्यांना मी शिवसेनेत आणले आहे.

राणेंच्या वक्तव्याचा आज नीलम गोर्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सातत्याने गरळ ओकायची, असे नारायण राणे यांचे सुरू असल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले.