जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुख्य शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष सुरु आहे. यादरम्यान शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (sanjay sawant) यांनी जळगावचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना गंभीर इशारा दिला आहे.
काय म्हणाले संजय सावंत?
संजय सावंत (sanjay sawant) यांनी जळगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना “तुम्ही जर जिवंत आईचं दूध प्यायला असाल तर माझ्या फोनवर धमकी देऊन बघा, जे ठिकाण सांगाल तिथे उभा राहून तुमच्याशी दोन हात नाही केले तर बाळासाहेबांचा शिवसैनिक नाव लावणार नाही. धमकी आम्हालाही देता येते. आम्ही केवळ धमकी देणार नाही. तर यापुढचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही”, असा इशाराच गुलाबराव पाटील यांना दिला.
'…तर तुम्हाला जिल्ह्यात फिरु देणार नाही', शिवसेनेचा गुलाबराव पाटलांना इशारा pic.twitter.com/zSrrOjPmh2
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 16, 2022
तसेच “कुणालाही धमकी देऊ नका. धमकी आम्हाला सुद्धा देता येते. ज्यादिवशी आम्ही धमकी देऊ, त्यावेळी आम्ही फक्त धमकीवर थांबणार नाहीत. त्याच्यापुढचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. जे काही कराल ते सुखाने करा. पण शिवसैनिकाच्या केसाला धक्का जरी लागला तर तुम्हाला जिल्ह्यात फिरु देणार नाही हे लक्षात ठेवा”, असेदेखील संजय सावंत (sanjay sawant) यावेळी म्हणाले.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय