शिवसेनेच्या आमदारांना गुजरात मध्ये मारहाण; संजय राऊतांचा आरोप

0
75
Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षा विरोधात बंड पुकारत आमदारांसह गुजरात गाठले आहे. सुरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत असून राज्यात मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेच्या 2 आमदारांना गुजरात मध्ये मारहाण करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

आमचे अनेक आमदार हॉटेल मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याविरुद्ध हल्ले करण्यात आल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्याविरोधात कठोर कारवाई करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे हे आमचेच सहकारी आहेत. त्यांच्या मनात नाराजी असेल तर त्यांनी मुंबईला येऊन चर्चा करावी. सुरतला जाऊन त्यांच्याशी चर्चा करणे, हे पक्षशिस्तीत बसत नाही असे राऊत यांनी सांगितले. शिवसेनेनं यापूर्वी देखील असे अनेक प्रसंग बघितले आहेत आणि या सर्वातून शिवसेना पुन्हा एकदा उभी राहिली आहे असेही संजय राऊत म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here