शिवसेनेचे ‘हे’ दोन खासदार बंडखोरीच्या तयारीत; शिंदे गटात होणार दाखल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जाहीरपणे आणखी दोन शिवसेना खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हेही आता शिंदे गटात दाखल होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे समर्थक आमदार, पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यामुळे शिवसेनेत पदाधिकारी गळती सुरु झाली आहे. अशातच आता सेनेचे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हेही बंडखोर शिंदे गटात दाखल होणार आहेत. दोन्ही खासदारांनी मुंबईतील मातोश्रीवरील बैठकीला तसेच कोल्हापुरात झालेल्या पक्षाच्या मेळाव्याला गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

खासदार संजय मंडलिक यांच्याकडून शिंदे गटात सहभागी होण्यावर जवळपास निश्चित झाले आहे. खा. धैर्यशील माने सुद्धा लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन खासदारांनी बंड केल्यास हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. तसेच यामुळे शिंदे गटाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे.