हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुर्ची देतानाचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यासंदर्भात त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. याच संदर्भाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “ही चु…गिरी बंद करा”, असं राऊत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यामुळे मुंबईत भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्लीतही आता भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत वादात सापडले आहेत. कारण यांच्या त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्यावर शरद पवार यांना खुर्ची देण्यावरून भाजप नेत्यांकडून राऊतांवर निशाणा साधण्यात आला होता. त्यांना उत्तर देताना राऊतांनी पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. …गिरी बंद करा, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत आज भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी संजय राऊतांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
काही दिवसापूर्वी मुंबईत भाजप नगरसेविका शीतल कुंभार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत याचा विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत भाजपवर टीका करताना राऊतांनी अपशब्द वापरले असल्याचा आरोप भाजप नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीत केला होता. त्यानंतर आता दिल्लीत राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.