हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत तातडीने मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे व भाजपवर निशाणा साधला. “नारायण राणे यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, तुम्हाला केंद्रीयमंत्री बनवले आहे. तुमच्याकडे जी खाती ती तुम्ही सांभाळावीत. त्यातून विकास करावा. उगाच बकवास करू नये. बकवास केल्यास याद राखा शिवसेना आहे. शहाणपणा कराल आणि अंगावर याला तर लक्षात ठेवा कि आम्हीही कुणाला घाबरणार नाही, असा इशाला राऊत यांनी राणे यांना दिला आहे. तसेच भाजप परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करेल, असा टोलाही लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप, नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात एक गुन्हा झाला धमकीचा. अशी धमकी जेव्हा प्रधानमंत्र्यांना दिली जाते. केन्द्रीय मंत्र्याना दिली जाते. त्यावर पोलीस एक्शन घेते. योगी आदित्यनाथ यांच्याविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरे गेले. त्यावेळी अपशब्द वापरणार्याना सहा सात वर्षे तुरुंगात आहेत. देशात तालिबानी पद्धतीचे राज्य नाही. सुडाने कारवाई करायला आमच्या हातात ईडी, सीबीआय नाही. आम्हाला कुठे सुडाने कारवाई होते हे बोलायला लावू नये. कारवाई हि सुडाची असो किंवा बिनबुडाची असो कारवाई हि कायदेशीरच असते.
भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यांच्या हातात आहे ते कुणावरही कारवाई करू शकतात. अनभाजप परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करेल. अनिल परबांविषयी बोलताना राऊत म्हणाले की, त्यांच्यावर बिनधास्त करावी. आम्ही घाबरत नाही. सरकार पाडण्याविषयी राऊत म्हणाले की, आमचे सरकार पाडणार असे म्हणतायत. हे सरकार तुम्ही पाडूनच दाखवा. आम्ही तयार आहोत.