कराडची दरबार मिरवणूक ही हिंदू एकता आंदोलनाची होती की भाजपची?

Shashiraj Karpe Vikram Pawaskar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

शिवजयंती निमित्त कराड येथे हिंदू एकताआंदोलनाच्यावतीने दरवर्षी दरबार मिरवणूक काढली जाते. यंदाही हि मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. . मात्र, या मिरवणुकीवरून आता राजकारण केले जात असल्याचे दिसून आले आहे. यंदाची काढण्यात आलेली दरबार मिरवणूक ही हिंदू एकता आंदोलनाने काढली होती की भाजपाने? असा सवाल करीत या मिरवणुकीत स्थानिक नेत्यांव्यतिरिक्त भाजपच्या नेत्यांना का बोलवण्यात आले, असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे.

कराड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे कराड शहर प्रमुख शशिराज करपे म्हणाले की, कराड येथील शिवजयंतीला एक पारंपरिक वारसा आहे. दरवर्षी शिवजयंती निमित्त कराड येथे ऐतिहासिक अशी दरबार मिरवणूक काढली जाते. नुकत्याच झालेल्या दरबार मिरवणुकीमध्ये जो प्रकार घडला. या मिरवणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला असल्यामुळे याचा आम्ही निषेध करीत आहे.

या मिरवणुकीत सर्व जाती-धर्माचे सर्व पक्षाचे लोक सहभागी झाले होते. हे कराडकर यांनी पाहिले आहे. अशावेळी विक्रम पावसकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावले. यामध्ये आमदार आशिष शेलार, रणजितसिह नाईक निंबाळकर याना बोलावून त्यांना जनसमुदाय समोर बोलायला लावले. तसेच त्यातून ही शिवजयंती, मिरवणूक जणू भाजपचीच आहे, असा आभास तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तो कराडकरांच्या जिव्हारी लागला आहे. शिवजयंतीमध्ये राजकारण आणल्यास यापुढे आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा करपे यांनी दिला आहे.