व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान; तुमच्यात दम असेल तर….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लीलावती रुग्णालायतून डिस्चार्ज भेटल्यानंतर अमरवती खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुमच्यात तर दम असेल तर महराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा असं खुलं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यावर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली

माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांच्यात जर दम असेल तर त्यांनी महाराष्ट्रातून कुठूनही माझ्या विरोधात निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी. राज्यातील कोणताही जिल्हा निवड, मी तुमच्या विरोधात उभी राहील. नारी शक्ती काय असते हे मी त्यांना दाखवून देईन. महाराष्ट्रातील जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.

मी कोणताही गुन्हा केलेला नाही. हनुमान चालीसा म्हणणे हा गुन्हा असेल तर १४ दिवसच काय, १४ वर्षे तुरुंगात जायची माझी तयारी आहे असं नवनीत राणा म्हणाल्या. माझ्यावर जो अन्याय झाला, तुरुंगात ते पोलीस ठाण्यात त्यावर मी लवकरच बोलणार आहे. महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार आपण दिल्लीत करणार आहोत असेही त्यांनी सांगितले

मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची लंका आहे अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला नामोहरण करण्यासाठी प्रचारात उतरणार असल्याचे नवनीत राणा यांनी जाहीर केलं.