शिवसेना पदाधिकाऱ्याच्या पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे 

सांगली शहर शिवसेनेचे पदाधिकारी अनिल शेटे यांच्या पत्नी गीता अनिल शेटे यांनी मीरा हौसिंग सोसायटी मधील पडक्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. त्यावेळी आत्महत्येची घटना उघडकीस आली. गीता शेटे यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेची विश्रामबाग पोलिसात नोंद झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, गीता शेटे या गुरुवारी सकाळी सहा वाजता आपल्या घरातून दूध आणण्यासाठी म्हणून बाहेर पडल्या होत्या. बराचवेळ झाला तरी त्या घरी परत आल्या नाहीत. त्यांच्या घरच्यांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला मात्र, त्या कुठेच मिळून आल्या नाही. शोधा शोध सुरू असताना  सकाळी साडे अकराच्या सुमारास, मीरा हौसिंग सोसायटीतील पडक्या विहिरीत एका मुलाला गीता शेटे यांचा मृतदेह तरंगताना निदर्शनास आला.

याची माहिती शेजाऱ्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात कळवली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यासाठी पोलीसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमची मदत घेतली. या टीम मधील सदस्यांनी काही वेळातच मृतदेह विहिरीतून बाहेर काढून, शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केला. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली असून गीता शेटे यांनी आत्महत्या का केली याचा उलघडा अद्याप झाला नसून पोलीसांचा तपास सुरू आहे.  दरम्यान, एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”