हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केले. तसेच यावेळी पुरंदरेंना त्यांनी आदरांजलीही वाहिली. “शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. उद्धव ठाकरे यांना दिवाळीपासून हा त्रास जाणवत होता. उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच गिरगावातील एच. एन. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी त्यांना मिळताच त्यांनी तीव्र शोक व्यक्त केले. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदरांजली वाहिली.