मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार गोव्याहून आता मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आहेत. सर्व आमदार सर्वात पहिल्यांदा विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते विमानात बसले आणि मुंबईच्या दिशेला रवाना झाले. पुढच्या दोन तासात हे सर्व आमदार मुंबईत दाखल होतील. या आमदारांच्या विमानात बसतानाचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत आमदार विमानात आसन ग्रहण करताना दिसत आहेत.
शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला रवाना, विमानातला व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/riAYHPQHyj
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 2, 2022
शिवसेनेचे (Shivsena) सर्व बंडखोर आमदार विधान परिषदच्या 10 जागांच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी रात्री म्हणजे 20 जूनला रात्री मुंबईहून गुजरातच्या दिशेला रवाना झाले होते. त्यानंतर ते तिथून गुवाहाटीला गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या 11 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व असे फेरबदल झाले. विशेष म्हणजे शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या शिवसैनिक आमदारांमुळेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सगळ्यामुळे शिवसेनेत फूट पडली होती.
त्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) या बंडखोर आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजप आणखी सक्षम झाली आहे. या सर्व घडामोडींनंतर अखेर 11 दिवसांनी शिवसेनेचे (Shivsena) सर्व बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल होत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने मुंबईत आणलं जात आहे.
हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या
आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या
Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!
Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!