कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील सांगवड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सांगवड सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीत श्री सिध्देश्वर शेतकरी विकास पॅनेलने विरोधी पॅनेलचा मोठ्या फरकाने दणदणीत पराभव करून 13-0 ने विरोधी पॅनेलला धोबीपछाड केले.
या निवडणुकीमध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणारे श्री सिध्देश्वर शेतकरी विकास पेनेल प्रचंड बहूमतांनी निवडून आले. मतदारांनी 13- 0 आशा फरकाने विजयी करून मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलवर सभासदांनी शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार आप्पासो बंडू नांगरे, मधुकर हिंदुराव सूर्यवंशी, तानाजी सयाजी शेजवळ, सचिन अधिक देसाई, संभाजी श्रीरंग सूर्यवंशी, हणमंत आनंदा सूर्यवंशी, सुरेश एकनाथ बांदल, विश्वास शामराव शेवाळे, संगीता महेश कदम, इंदूबाई वामन माने, रामचंद्र विठ्ठल कांबळे, जगन्नाथ शंकर गुरव, तानाजी लक्ष्मण चव्हाण असे 13 उमेदवार 150 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.
या निवडणुकी मध्ये डी. वाय. पाटील, ईश्वर पाटील, सुदाम नांगरे, अशोक खराडे, उत्तमराव खराडे, भरत बांदल, आबासो शिंदे, रामदास हिंगमीरे, रामचंद्र कुंभार, नारायण पाटील, गणपत शेजवळ, उत्तमराव सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी, हणमंत पाटील, दिपक गव्हाणे, प्रकाश सूर्यवंशी, आण्णासो पाटील, दादासो पाटील, संतोष पाटील, शंकर पाटील, बाळासो कुंभार, संतोष शेजवळ आदी कार्यकर्त्यांनी पॅनेलच्या विजयासाठी परिश्रम घेतले. सांगवड सोसायटीच्या निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
सर्व विजयी उमेदवारांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, सौ. सुग्रा बशीर खोंदू, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी यांनी अभिनंदन केले.