हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला; शिवाजी आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर शिवसेने कडून कोल्हेना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला असा टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी लगावला.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची औकात पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला. आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय?, असा सवाल आढळराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान यापूर्वी शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली. ज्या उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळे अमोल कोल्हे राजकारणात आले त्यांनाच ते आज विसरले आहेत. तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका” अशा शब्दात किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल चढवला.

Leave a Comment