हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होते असे ते म्हणाले. परभणीमधील गंगाखेड तहसीलसमोर ओबीसी संघटनांकडून सोमवारी ओबीसी आरक्षणासाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे त्यावेळी महादेव जानकर बोलत होते.
“शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिले, ते मराठ्यांचे होते. मराठ्यांना पहिलं आरक्षण नव्हते. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं? छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होता. त्यावेळी मराठ्यांना वाटले आम्ही सर्वत्र मिरवतो, आम्हाला नको ते आरक्षण अन् आज काय अवस्था झाली बघा.”
दरम्यान, माझे 30-35 आमदार होऊ द्या. ओबीसींची 10 मिनिटांत गंमत करून दाखवतो. मराठ्यांना, मुसलमानांना ही आरक्षण देतो असे जानकर यांनी म्हंटल. मुस्लिमांनवर तर किती अन्याय आहे, गॅरेज बघितलं कि मुसलमान, अंड्याचे दुकान म्हणलं की मुसलमान, कोंबडीचे दुकान बघितले की मुसलमान, त्यांचा कुठं कलेक्टर नाही, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.