हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर, अवघ्या आठ महिन्यांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, सोमवारी कोसळला.. या घटनेमुळे, महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जातोय.. भारतीय नौदलाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, या पुतळ्याची उभारणी करुन घेतली होती.. ज्याचं उद्घाटन, लोकसभेपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि महायुतीतील, सर्वप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं.. खरतर मागील काही दिवसात, बदलापूरसारख्या गंभीर प्रकरणाचा उपयोग, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात असताना, आता या दुर्दैवी नव्हे, तर लाजिरवाण्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेचही, राजकारण करायचं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सोडलं नाही… हा पुतळा नेमका काय आहे?, तो नेमका कोणी बनवला?, पुतळा बनवणाऱ्या कारागिराचं, ठाणे कनेक्शन नेमकं काय आहे?, पुतळा बनवण्यापासून, उभारण्यापर्यंत.. आणि अगदी उद्घाटनापासून , ते कोसळण्यापर्यंत झालेल्या राजकारणाचा प्रकरणातील, दोषींचा, आणि यातल्या अनेक मुख्य , माध्यमांसमोर न आलेल्या घडामोडींचा , हा ए टू झेड घटनाक्रम..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शौर्याला सलाम’ म्हणून, 4 डिसेंबर 2023 रोजी , नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला.. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे, कामाच्या दर्जावरून ,आणि या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी , केलेल्या घाईवरून , आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय.. राज्यभर आंदोलन छेडण्याचा, इशाराही दिला.. नौदल दिन, हा साधारणपणे मुंबईत साजरा केला होता.. मात्र, मागील वर्षी , सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ, आणि मालवण किनाऱ्यावर, नौदल दिन साजरा करण्यात आला होता.. त्याच निमित्ताने , राजकोट किल्ला, येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, हा नौदलाच्या वतीने, उभारण्यात आला होता.. पण हा पुतळा उभारताना, अत्यंत घाईगडबडीने तो उभारण्यात आला होता.. हा पुतळा , शास्त्रोक्त पद्धतीने उभारण्यात न आल्याने, त्यात बऱ्याच त्रुटी असल्याचंही, बोललं जातंय.. यात सर्वात संतप्त गोष्ट अशी, की, हा पुतळा उभारण्याचे कंत्राट, ठाण्यातील जयदीप आपटे , या अवघ्या 25 वर्षांच्या तरुणाला देण्यात आलं होतं..
जयदीपचं वय लहान आहे म्हणून त्याला विरोध नाही, पण हा पुतळा उभारण्यापूर्वी, जयदीप आपटे, याला फक्त, दीड ते दोन फुटांचे पुतळे बनवण्याचा अनुभव होता.. त्यानं स्वत:च , एका मुलाखतीत अशी माहिती दिली होती.. त्यामुळे इतका कमी अनुभव असलेल्या, तरुण शिल्पकाराला, शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचं कंत्राट, का देण्यात आलं, असा सवाल आता निर्माण झालाय.. याप्रकणी, पोलिसांनी जयदीप आपटे, आणि Structural Consultant चेतन पाटील, या दोघांवर गुन्हा दाखल केलाय.. चेतन पाटील, यांनी, त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.. मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही.. मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं.. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केलं होतं ते ठाण्यातील कंपनीने काम केलं होतं, असं आता, त्याने स्पष्टीकरण दिलंय.. त्यामुळे हा पुतळा उभारणारा, ठाण्याचा 25 वर्षीय जयदीप आपटे नेमका कोण?, हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल..
जयदीप आपटे , हा कल्याणमधील अवघ्या 25 वर्षांचा तरुण आहे.. जयदीप आपटे, यानेच राजकोट किल्ल्यावरील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, 28 फूट उंचीचा, ब्राँझचा पुतळा उभारला होता.. 28 फूट उंचीचा, ब्राँझचा पुतळा बनविण्यास, साधारण 3 वर्षांचा काळ लागतो.. पण हा पुतळा , जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली, आणि तो डिसेंबर 2023 पर्यंत, म्हणजे अवघ्या सात महिन्यांमध्ये, पुतळ्याच काम पूर्ण झालं.. अशी माहिती, जयदीप आपटे, याने सनातन प्रभात, या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली होती.. याच सनातन प्रभात नावाच्या, दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी अनेक धक्कादायक खुलासेही केले होते…या मुलाखतीत, त्याने या कामाबद्दल, अनेक गोष्टींवर भाष्य केलं होतं.. त्याने या मुलाखतीत म्हटले होते , की, या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं, तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला.. संधी मोठी आहे, सगळं व्यवस्थित पार पडले, तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल, असे वाटले.. पण म्हटलं, काय व्हायचं ते होऊ दे.. संधी हातातून सोडायची नाही…कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय या कामाच्या आधी 3 – 4 शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती.. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करताना अभ्यास होत होता.. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती ‘एखादा पुतळा तयार करणार का?’, अशी.. भारतीय नौदल काम करून घेणार.’ ‘त्यात, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार; म्हणून मग मीच ठरवले की काम करायचे..
एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे ३ लहान मॉडेल बनवले.. त्यातील २ नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले, असे जयदीप आपटेने, मुलाखतीत सांगितले होतं.. महत्त्वाचे म्हणजे, त्यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, यांच्यासह अनेकांनी , या पुतळ्याच्या कामाबाबत , प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.. तसेच या कामाच्या चौकशीची मागणी केली होती.. त्यामुळे आता काही प्रश्न , स्वाभाविकपणे सर्वांच्याच समोर येतात.. पहिलं म्हणजे, अनुभव नसतानाही, ठाण्याच्या जयदीप आपटे, याला हे कॉन्ट्रॅक्ट, कोणत्या आधारावर देण्यात आलं? खरंतर पुतळ्याच्या कामाला , दोन वर्षांहून अधिकचा वेळ लागलं असताना, त्यानं ते अवघ्या, सात महिन्यात कसं पूर्ण केलं?, पंतप्रधान मोदी, आणि शिंदे फडणवीस सरकारनं, या भव्यदिव्य पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई कशासाठी केली? बाकी या प्रश्नांची उत्तरं, तपास जसा पुढे सरकेल, तस आपल्याला मिळतीलच, पण सरकारकडून, एकामागून एक घडत असणाऱ्या चुकांमुळे, विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झालेत..
यावर सगळ्यात पहिली, आणि संतप्त प्रतिक्रिया उमटली , ते कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, वैभव नाईक यांची.. वैभव नाईक, थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, ऑफिसमध्ये दाखल झाले.. हातात रॉड घेऊन , त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये , सिनेस्टाईल तोडतोड केली. .. दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात , आंदोलनाचा इशारा , वैभव नाईक यांनी दिला.. संजय राऊत यांनीही, या सगळ्या प्रकरणावरून , एकनाथ शिंदे यांना चांगलंच धारेवर धरलं.. राऊत म्हणाले , की, 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर एक पुतळा बसवला.. तो पुतळा आताही त्या स्थितीत आहे.. शिवरायांचा असा अपमान मुघलांनीदेखील केलेला नाही.. पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या सरकारने बनवला होता तो कोसळला.. त्यांनी चांगल्या मनाने पुतळा बनवला नव्हता, तर राजकीय मनाने बनवला होता.. महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा.. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी, त्यांनी यावेळी केली..
तर दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका बसला, अशा संताप्त शब्दात, सरकारवर टीका करण्यात आलीय. चूक झाली असेल, तर शासनाने माफी मागितली पाहिजे.. सोबतच या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील, यांनी या सगळ्या प्रकरणावर बोलताना दिली.. दुसऱ्या बाजूला सरकारने या सगळ्या प्रकरणाचं राजकारण न करता या दुर्दैवी घटनेवर आपली बाजू स्पष्ट केलीय… छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता. या पुतळ्याची उंची 28 फूट होती. परंतु नागरिकांची मागणी होती की, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 फूटांचा पुतळा उभारण्यात यावा. 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलावता येईल…तो राष्ट्राचा सन्मान असेल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीप्रमाणे मजबूत पुतळा उभारला जावा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धरतीवर हा पुतळा पुन्हा महाराष्ट्र शासन उभा करू शकतो. यावेळी भव्य असं स्मारक उभारताना परिसराचा विकास करू, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलय…
राज्य सरकारने मात्र झालेल्या घटनेत सरकारचा काहीच संबंध नसून याची जबाबदारी नौदलावर ढकललीय… छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्रकिनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आलय…
थोडक्यात श्रेय घेण्यासाठी राजकीय मंडळी पुढाकार घेतात… मात्र जेव्हा दुर्दैवी घटना घडते तेव्हा त्याची जबाबदारी त्यांना नको असते, हेच यातून उघडपणे स्पष्ट होतय… महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं इतकं किळसवाणं राजकारण कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल… त्यामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण? शिंदे फडणवीस सरकार, भारतीय नौदल, कॉन्ट्रॅक्टदार की या सगळ्यांना सत्तेच्या पदावर बसवणारी तुम्ही आम्ही जनता, तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…