हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shivalik Small Finance Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Shivalik Small Finance Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी व्याजदरात वाढ केली आहे.
5 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
हे नवीन दर 5 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर आता बँकेकडून आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना बचत खात्यावर जास्तीत जास्त 7.30 टक्के तर एफडीवर 7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर दिला जाईल.
Shivalik Small Finance Bank च्या बचत खात्याचे व्याज दर तपासा
आता Shivalik Small Finance Bank च्या बचत खात्यातील 1 ते 10 लाख रुपयांच्या रकमेवर 3.50%,10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 4%, 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर 4.50%.आणि 2 कोटी ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर 6% व्याज दिले जात आहे. याशिवाय बँक 2 कोटी ते 7 कोटी रुपयांच्या रकमेवर 7.25% आणि 7 कोटी रुपयांवरील रकमेवर 7.30% व्याज देत आहे.
Shivalik Small Finance Bank च्या एफडीचे व्याजदर
त्याचप्रमाणे Shivalik Small Finance Bank कडून 7 ते 14 दिवसांच्या FD वर 3.75%, 15 ते 29 दिवसांच्या FD वर 4%, 30 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.50%, 91 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 5%, 6 महिने ते 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75% आणि 12 महिने ते 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75% व्याज दर देईल. दुसरीकडे, बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना स्टॅण्डर्ड व्याजद दरापेक्षा 50 बेस पॉइंट्स जास्त व्याज दिले जाते आहे. याचप्रमाणे बँक 24 महिने ते 36 महिन्यांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 8 टक्के व्याज देत आहे.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://shivalikbank.com/interest-rates.php
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये