व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवभक्ताने स्वतःच्या खर्चाने उभारला शिवरायांचा 50 फुटी अश्वारूढ पुतळा ; छत्रपती उदयनराजेंनी केले उद्घाटन

सातारा | पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रोहन यादव या शिव भक्त तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 50 फूटी अश्वारूढ पुतळा उभारला असुन मराठ्यांची राजधानी सातारा या नावाने सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे.रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा उपक्रम करून अनोखी शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी खट्ट व्हावा हा या मागचा उद्देश आहे.

मुंबईपासून बेंगलोर पर्यंत जवळपास एक हजार किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर पन्नास फुटी अश्वारुढ पुतळा एकमेव सातारयातील वेळे गावात असुन हा पुतळा पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांसाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंट चा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांची राजधानी सातारा या दोन्हींची आठवण राहावी असा आहे.

या महामार्गावरुन येणारया शिवभक्तांना कायम स्मरणात रहावे यासाठी हा सेल्फी पाॅइन्ट उभारण्यात आला आहे.छत्रपती घराण्याचे 13 वंशज खा.उदयनराजे यांनी या सेल्फी पॉईंट चे अनावरण केले.या वेळी बोलत असताना उदयनराजेंनी मी माझे भाग्य समजतो की मला या सेल्फी पॉईंट च अनावरण करण्याची संधी मिळाली या सेल्फी पॉईंट मुळे सातारा जिल्ह्याचा इतिहास कानाकोपऱ्यात पसरणार असून जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’