व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पत्नीची हत्या करून लिपिक पसार; कौटुंबिक कलह की अजून काही याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू

औरंगाबाद प्रतिनिधी | व्यायाम करण्याच्या डंबेल्सने आणि कपडे धुण्याच्या दगडाने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिसादेवी या गावात उघडकीस आली. कविता सिध्देश त्रिवेदी असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सिध्देश गंगाशंकर त्रिवेदी असे मारेकरी पतीचे नाव आहे. दरम्यान, कविता त्रिवेदीची हत्या कौटुंबिक कलहातून झाली की इतर कारणातून झाली याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.घटनेला दोन दिवस उलटले आहे मात्र फरार पतीचा अद्याप कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही

सिध्देश त्रिवेदी हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिपीक या पदावर नोकरीला होते. २०१२ साली सिध्देश यांचा विवाह नाशिक येथील रहिवासी असलेल्या कविता अवस्थी यांच्यासोबत झाला होता. त्रिवेदी दांम्पत्याला ८ वर्षाचा मुलगा लंकेश उर्पâ रूद्र आणि ३ वर्षाची मुलगी त्रिशा अशी दोन आपत्ये आहेत. मंगळवारी रात्री देखील सिध्देश आणि कविता यांच्यामध्ये कुरबुर झाल्यानंतर पहाटे तीन वाजेच्या सुमारास सिध्देशने पत्नी कविताच्या डोक्यात व्यायामासाठी आणलेले डंबेल्स घातले. त्यानंतर बाथरूममधील कपडे धुण्याचा दगड देखील कविताच्या डोक्यात घालून निर्घुणपणे तीची हत्या केली. त्यानंतर मुलांना घरात कोंडून सिध्देश त्रिवेदी याने रक्ताने माखलेले कपडे घरात टावूâन नवीन कपडे घालून दुचाकी घेवून पसार झाला होता.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी कविताची मुलगी त्रिशा व मुलगा लंकेश उर्फ रूद्र हे दोघे रडू लागल्याने शेजाNयांनी जावून बघितले असता खूनाचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधीकारी डॉ. विशाल नेहुल, चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील, पोलिस अंमलदार दिपक देशमुख, दिपक सुरासे, अण्णा गावंडे, डकले, शेकडे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कविताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात दाखल केला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात सिध्देश त्रिवेदी याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.