Wednesday, October 5, 2022

Buy now

आ. शिवेंद्रराजेंनी विनाकारण लुडबूड करू नये : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यसभेबाबतचा निर्णय हा शिवसेना आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील असून हे शिवसेना आणि छत्रपती घराणे पाहून घेऊ. विनाकारण याच्यामध्ये लुडबूड करून विनाकारण आता आगीत तेल ओतण्याचे काम आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी करू नये, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी लागवला.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभा निवडणुकीत गेम झाल्याची टीका आ. शिवेंद्रराजेंनी केली होती. त्याला ना. शंभूराज देसाईंनी प्रत्त्युत्तर दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ना. देसाई यांनी आ. शिवेंद्रराजेंचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे साताऱ्यात भाजप व शिवसेनेच्या आमदारांच्यात चांगलीच जुंपलेली पहायला मिळत आहे.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलण्यापेक्षा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचं स्पष्ट मत कालच व्यक्त केलेल आहे. कुणीही संभाजीराजेंचा गेम केलेला नाही विशेषतः शिवसेनेने केलेला नाही, हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा विनाकारण आता आगीत तेल ओतण्याचे काम आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी करू नये.