Satara News : खोटे बोलून बोगस राजकारण करू नये; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर घणाघाती टिका

Shivendraraje Bhosale politics Udayanraje Bhosale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
गोडोली तळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामाला डिपीसीमधून निधी मिळालाय आणि याच डिपीसीला जे कधीच उपस्थित नसतात आणि मग काम मी केलय असं ते सांगतायेत. कामं झाली की मी केली आणि कामं झालीच नाही तर त्यात दुसऱ्यांना दोषी ठरणार असे ते सांगत फिरतायेत. हे राजकारणच यांच बोगसपणाच राजकारण आहे, अशी घणाघाती टीका साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नाव न घेता खा. उदयनराजे भोसले यांच्यावर केली.

सातारा येथील गोळीबार मैदान येथे रविवारी ‘खेळ पैठणीचा होम मिनिस्टर’ कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसल यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. या कार्यक्रमात शिवेद्रराजेंनी उदयनराजेंवर निशाणा साधला. यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की, आज गोडोली तळ्याचे सुशोभीकरणाचे मोठे काम झाले आहे. वास्तविक या कामासाठी जो निशी मजूर केला जातो तो डीपीडीसीतून केला जातो. मात्र, काहीजण उगाच काहीतरी बोलून कामे आम्हीच केली असे सांगत आहेत.

https://www.facebook.com/watch/?v=170669259132211&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing

काही दिवसांपूर्वी खा. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून उदयनराजे भोसले यांच्या आरोपांना उत्तर दिले जात असून सातारा शहरातील गोडोली तळ्याच्या सुशोभिकरणावरुन खासदार उदयनराजे यांच्यावर शिवेद्रराजेंनी निशाणा साधला आहे.