खासदार उदयनराजेंचे काम म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लाव…; शिवेंद्रराजेंचा टोला

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप या एकाच पक्षात असूनही एकमेकांविरोधात बोलणाऱ्या छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता सातारा मेडिकल कॉलेजच्या कामावरून टोलेबाजी होऊ लागली आहे. काल खा. उदयनराजेंनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला आ. शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काहीजणांनी काम बंद पाडले. ठेकेदाराला त्रास देवून आर्थिक मागणी होत आहे. खासदार कमी बोलतात पण त्यांचे काम हे मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली असे असते’ असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.

सातारा येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवेद्रराजे म्हणाले की, सातारा शेत उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेतून खा. उदयनराजेंचे लोकदंगा करून बाहेर पडले. सचिव मनवे यांच्याबद्दल ते बाेलत असले तरी काेर्टाने मनवेंच्या बाजून निकाल दिला. त्यानंतरच त्यांना कामावर हजर करून घेतले आहे. त्यामुळे कोर्टाचा निकाल त्यांना मान्य नाही काय? ते कोर्टापेक्षा मोठे आहेत काय ? ते म्हणतील तेच खरे काय?

बाजार समितीच्या 17 एकर जागेचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. जागेचा ताबा आमचा असून सातबाऱ्यावर बाजार समितीचे नाव लागले आहे. काही लोकांचा प्रयत्न ही जागा परत मिळावी, त्याचे प्लॉट पाडून कोट्यवधी कमावण्याचा इरादा होता. पण, आमची साथ मिळाली नाही म्हणून ते बाजूला झाले. आमचा हेतू बाजारपेठ वाढावी हा आहे. निवडणुकीनंतर फळे व भाजीपाला मार्केट, व्यवसायिक गाळे, जनावरांचा दवाखाना, सुसज्ज पार्किंग असा अद्ययावत प्लॅन केला असल्याचे शिवेंद्रराजेंनी सांगितले.