राजेश टोपेंकडून जावलीतील रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी ; शिवेंद्रसिंहराजेंनी मानले आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेढा : दुर्गम जावली तालुक्यांतील कडेकपारीतील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न रुग्नावाहीका नसल्यामुळे जटील झाला होता. परंतु महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मत्री राजेश टोपे यांच्याकडे जावली तालुक्याचा लोकप्रतिनीधी म्हणुन पाठपुरावा केल्याने जावली तालुक्याकरीता रुग्णवाहिकेची मागणी आरोग्यमत्री राजेश टोपे यांच्याकडे करताच आठ दिवसात दोन रुग्णवाहिका मेढा रुग्णालय व दुर्गम बामणोली गावाला दिल्यामुळे दुर्गम जावलीच्या रुग्नवाहीकेचा प्रश्न मार्गी लावु शकलो . याबाबत राज्याचे आरोग्यमत्री राजेश टोपे यांचे विषेश आभार आ शिंवेद्रराजे भोसले यांनी पंचायत समिती जावली येथे रुग्नवाहीका लोकार्पण सोहळ्यात केले .

यावेळी जिल्हापरीषदच्या १६ वित्त आयोगाच्या व्याजातुन ३ नवीन रुग्न वाहीका व राजेश टोपेच्या विषेश सहकार्यातुन २ रुग्णवाहिका अशी पाच रुग्णवाहिकेच लोकार्पण सोहळा मेढा येथे पार पडला .यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की कोव्हीड १९ च्या दुसऱ्या लाटेत दुर्गम जावळीत रुग्णवाहिका नसल्यामुळे जनतेचा ससेसहोलपट होत होती . मात्र राज्याच्या आरोग्य मंत्र्याकडे पाठपुरावा करत रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लागला आहे .

तालुक्याचा लोकप्रतिनीधी म्हणुन जावली तालुक्यांतील आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकार्याच्या रिक्त पदाच्या भरती करीता राज्याचे आरोग्यमत्री व उपमुख्यमत्री अजित पवार याच्याकडे मागणी केली आहे . जावलीतील आरोग्य विभागातील सर्वपदे भरणारच अशी ग्वाही यावेळी आ शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली .

यावेळी रुग्नवाहीकेच्या पाच वाहनचालकांचा सत्कार आ शिवेंद्रराजे भोसले याच्याहस्ते करण्यात आला .सभापती जयश्री गिरी , उपसभापती सैारभ शिंदे , जि प सदस्य अर्चना रांजणे , तहसिलदार राजेंद्र पोळ , पंचायत समिती सदस्य विजय सुतार , नगराध्सक्ष पांडुरंग जवळ , तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहीते , गट विकास अधिकारी सतिश बुद्धे . आदी उपस्थित होते