अद्भुत चमत्कार! झाडातून वाहू लागली गंगा?; गावकऱ्यांनी केली झाडाची पूजा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील शिवपुरी-जिल्ह्यातील पोहरी नगर या ठिकाणी एक अद्भुत घटना घडली आहे. यामध्ये सोमवारी सकाळी झाडावरून पाण्याचा प्रवाह वाहताना (floating water from tree) पाहून लोक आश्चर्यचकित झाले. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. काही ग्रामस्थांच्या मते ही जलधारा गंगा नदीची आहे. हा दैवी चमत्कार असल्याचे मानत झाडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या (floating water from tree) प्रवाहाची गावकऱ्यांनी पूजा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोहरी नगरच्या मुख्य बाजारपेठेच्या ब्लॉक रोडवर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या काही लोकांना शिसवच्या झाडामधून पाणी वाहत (floating water from tree) असल्याचे दिसले. लोकांनी बारकाईने पाहिले असता त्यांना त्यातून गंगेसारखे स्वच्छ पाणी दिसले. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. यानंतर हळूहळू हि बातमी पसरल्यानंतर त्या झाडापाशी लोकांची मोठ्या प्रमाणात (floating water from tree) गर्दी जमली. काहींनी याला चमत्कार, तर काहींनी गंगा आल्याचे सांगितले.

गोपी जाटव या ग्रामस्थाच्या मते झाडातून सकाळपासून सतत पाणी वाहत (floating water from tree) आहे. या ग्रामस्थाने हा गंगा मातेचा चमत्कार असल्याचे सांगितले.तर दुसरीकडे ज्या शिसवच्या झाडातून पाण्याचा प्रवाह (floating water from tree) वाहत आहे ते शेकडो वर्षे जुने असल्याने त्याची मूळ पोकळ झाल्याने हा प्रवाह येत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काही जणांच्या मते झाडाच्या आजूबाजूला जमिनीत पाण्याची पाइपलाइन फुटल्याने हे पाणी येत आहे. पाईपमधून बाहेर पडणारे पाणी झाडाच्या मुळांच्या मदतीनेही बाहेर येऊ शकते असाही निकष आहे.

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू

Leave a Comment