शिवराज मोरे रिंगणात : महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस निवडणुकीत चुरस वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षातील ही अंतर्गत निवडणूक असली तरी युवकांमध्ये लोकशाही रुजविण्याची काँग्रेसची ही पद्धत वाखाणण्याजोगी आहे. जनतेचा बुद्धीभेद करण्यासाठी विरोधी पक्षाकडून अनेकदा असा गैरसमज पसरवला जातो की काँग्रेसकडे युवा कार्यकर्ते व राजकीय जडणघडणीत युवकांची फळी नाही. अशा अफवा पसरवणाऱ्यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ही निवडणूक उघड्या डोळ्यांनी पहावी, असे थेट आवाहन अध्यक्षपदाचे उमेदवार शिवराज मोरे यांनी केला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येकाच्या रोमारोमात पोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. यात युवकांची संख्या प्रचंड आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी या युवकांना लढण्यासाठी नेहमीच प्रेरणा दिलीय. सध्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराडचे असलेले शिवराज मोरे यांचीही उमेदवारी अध्यक्षपदासाठी आहे.

सामान्य घरातील युवक आणि सामान्यांशी नाते असलेला युवकच सामान्य युवकांचे प्रश्न जाणू शकतो. त्यामुळे राज्यभरातील युवा वर्गही शिवराज मोरे यांच्या पाठीशी उभा राहून या मतदान प्रक्रियेत हिरीरीने सहभाग नोंदविताना दिसत आहे. देशात अघोषित आणीबाणी असलेल्या आणि देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा सुरु असतानाच्या आजच्या काळात काँग्रेसचा विचारच देशाला तारु शकतो. त्यामुळे हाच विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवण्याचे कार्य शिवराज मोरे यांच्याकडून सुरु आहे. त्यांच्या खांद्यावर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आली तर हेच कार्य अधिक समर्थपणे त्यांना पुढे घेऊन जाता येईल, अशी राज्यातील युवकांची धारणा आहे. यासाठीच ही निवडणूक युवकांनी हातात घेतली आहे. राज्याच्या कोणत्याही शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणच्या युवकांच्या मनाचा कानोसा घेतला तर शिवराज मोरे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी हा युवा वर्ग अक्षरशः जीवाचे रान करत आहे. युवकांच्या मनाचे हे प्रतिबिंब शिवराज मोरे यांच्या गळ्यात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ घातल्याशिवाय राहणार नाही.

आजी- माजी आमदार, मंत्री यांचे पुत्र विरूध्द सामान्य कुटुंबातील शिवराज मोरे

एकीकडे आजी -माजी आमदार, मंत्री यांचे पुत्र आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी पक्ष संघटनेत निस्पृहपणे काम करणाऱ्या शिवराज मोरे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

शिवराज मोरे यांची कारकीर्द

2006 ते 2008 पुणे शहर NSUI सचिव

2008 ते 2010 राज्य सरचिटणीस NSUI

2010 ते 2012 प्रदेशाध्यक्ष NSUI

2012 ते 2015 प्रदेशाध्यक्ष NSUI (Elected)

2016 ते 2019 राष्ट्रीय सरचिटणीस NSUI (प्रभारी- गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, गोवा, सिक्किम, नागालॅंड)

2019 ते 2020 सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस

2020 के 2021 उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस