फडणवीसांना नव्हे, तर चंद्रकांतदादांनाच मुख्यमंत्री होण्याची घाई; जयंत पाटलांचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. पण चंद्रकांत पाटील यांना घाई आहे. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या जागी जाऊन बसायचे, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला, ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या पाणीकपातच्या आरोपावर देखील प्रत्यतूर दिले.

पुन्हा मुख्यमंत्री होण्याची देवेंद्र फडणवीस यांना काही घाई नाही. चंद्रकांत पाटलांना घाई आहे. ज्या वेळी प्रसंग येईल आणि आपण तिथ कधी बसू असं कदाचित त्यांना झालंय. त्यामुळे फडणसवीसांना माहीत आहे. त्यांच्या पक्षात त्यांचे कोण हितचिंतक आहेत आणि त्यांना हे सुध्दा माहीत आहे की, चंद्रकांत पाटील त्या यादीत नाहीत, असेही पाटील म्हणाले

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकारचा पुणे शहराचा पाणी कपात करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून पाणी कपात करण्यासाठी अशीच अकरा पत्रे देण्यात आली होती.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मधे पाणीकपात करण्यात आली होती.