हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे काही खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनो, नव्या चिन्हाची तयारी ठेवा आणि ते चिन्ह घराघरात पोचवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केल आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपण कायद्याने जो लढा द्यायचा तो देऊ, मात्र दुर्दैवाने या कायदेशीर लढाईत अपयश आलं आणि आपलं धनुष्यबाण हे चिन्ह हातून गेल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा आणि कमीत कमी कालावधीत ते चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
दरम्यान, शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार देखील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. येव्हडच नव्हे तर नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेतील काही नगरसेवकांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.