अहमदनगर प्रतिनिधी । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्येएका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं.
वारिस पठाण यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहेत. आज अहमदनगमध्ये वारीस पठाण यांच्या विधानाचा शिवसेनेने तीव्र निषेध करत जोरदार निदर्शने केली. शिवसेनेनं केलेल्या या आंदोलनात वारिस पठाण यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहनही करण्यात आलं.
दरम्यान, शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनिल रोठाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी वारिस पठाण यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. वारिस पठाण मुर्दाबाद, वारिस को पाकिस्तान भेज दो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी आंदोलनात पुरुष शिवसैनिकांबरोबरच मोठ्या प्रमाणावर महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.