मुंबई । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मृतिस्थळावर अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नावर पंकजांनी सूचक प्रतिक्रिया दिली
शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही. शिवसेना-भाजपची युती 2014मध्येही तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा युती तूटून राज्यात सरकार स्थापन होऊनही एक वर्ष उलटले आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर चर्चा करण्यात काही अर्थ उरलेला नाही, असे मत पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले. (Pankja Munde on Shivsena BJP re-alliance)
पंकजा मुंडे मंगळवारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त (balasaheb thackeray death anniversary) त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनामध्ये आदराच्या भावना आहेत. स्मृतिस्थळ असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत, ते सर्वांचे आहेत. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबासाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते. इतर अनेक पक्षातही असे संबंध असतात” असं पंकजा मुंडे बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिल्यानंतर म्हणाल्या.
'लोकांनी मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून दाखवावे'; खडसेंचे चॅलेंज
वाचा सविस्तर-👉 https://t.co/xgR6aVwjDk#HelloMaharashtra @EknathGKhadse @PrasadLadInd @BJP4Maharashtra @NCPspeaks— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
भाजपला जास्त मस्ती आली आहे, त्यांना धडा शिकवणारचं; जयसिंगराव गायकवाडांचा निर्धार
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/TvMKZw5cKz@BJP4Maharashtra @jaysinghraogaikwad @BJP4Maharashtra @NCPspeaks— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
समजूत घातली तरी 'ते' पक्ष सोडून गेले, पण आता…., जयसिंगराव गायकवाडांनी भाजप सोडल्यावर पंकजांची प्रतिक्रिया
वाचा सविस्तर-👉 https://t.co/ENKNBwMGR9@Pankajamunde @jaysinghraogaikwad @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
लोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? पोलीसही हप्ते घेतातच ना ? भास्कर जाधवांचे धक्कादायक वक्तव्य
वाचा सविस्तर-👉 https://t.co/xk3p546pjW#daru @_BhaskarJadhav #HelloMaharashtra @ShivSena— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही! मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं भरा! ऊर्जामंत्र्यांचा वीज ग्राहकांना करंट
वाचा सविस्तर- 👉https://t.co/lQtwwEvEpE@NCPspeaks @NitinRaut_INC #electricitybill #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in