हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई ने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्कील झालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकार वर टीका होत असताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी थेट मोदींची मिमिक्री करत महागाई वरून मोदींवर निशाणा साधला आहे. 60 सालो मे कांग्रेस ने कुछ किया है क्या असा सवाल मोदींनी केला होता अस म्हणताना त्यांनी मोदींची नक्कल केली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एक कार्यक्रमाला भास्कर जाधव यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलं असल्याचे भास्कर जाधव म्हणाले आहेत. तसेच मोदींची मिमिक्री करत भास्कर जाधव म्हणाले की, २०१४ साली या देशात ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं आहे का? मोदींना लोकांनी सांगितले काही नाही केलं मात्र आता लोकांना कळाले आहे की, काँग्रेसनं केलेलं विकायचे बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन टर्म मध्ये काहीही केलं नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.
मी सातत्याने सांगत होतो की, मोदी सरकार गॅस फुकट देत नाही. ते तुमचा विश्वासघात करणार आहेत, अनुदान बंद करतील. एखादा दुकानदार तुम्हाला नंतर पैसे देण्याच्या अटीवर सामान देतो तेव्हा त्याचा अर्थ दुकानदाराने तुम्हाला सामान फुकट नव्हे तर उधारीवर दिले असा होतो. तो तुमच्याकडून सव्याज पैसे घेणार आहे. मोदी सरकारने सामान्यांना घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान काढून घेतले. या अनुदानामुळे एक वर्ष तुम्हाला गॅस मोफत मिळणार होता. तो अगोदरही मिळत होता. मात्र, मोदी सरकारने हा मोफत मिळणारा गॅस विकत द्यायला सुरुवात करुन लोकांची फसवणूक केल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.