महायुतीचंच सरकार येणार – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती आले असून महायुतीला १६० जागांवर विजय मिळवणं शक्य झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नाला लोकसभेच्या जागावाटपाचा दाखला देऊन ‘फिफ्टी-फिफ्टी’ परिस्थिती राहणार असल्याचं तसेच आता समजून घ्यायची वेळ भाजपची असं सांगितल्यानंतर तोच कित्ता देवेंद्र फडणवीसांनी पुढे नेला आहे. दोन्ही पक्षांच्या मिळून काही अपेक्षा आहेत. आम्ही एकत्र बसून त्यावर निर्णय घेऊ असं सांगत मुख्यमंत्रीपदाबाबत ‘आमचं ठरलंय’ अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे.

निकालानंतर सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. बाकी मित्रपक्षांचे नेतेसुद्धा पत्रकार परिषदेला उपस्थित होते, मात्र सगळ्यांचेच चेहरे पडल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्याची ‘हीच ती वेळ’ अशा चर्चांनाही या पत्रकार परिषदेनंतर ऊत आला आहे.

Leave a Comment