भाजपवाले देशी दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागलेत; शिवसेनेची जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजपने या गोष्टीचा निषेध करत विरोध दर्शवला होता. यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहीत आहे. तरीही महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला ‘वाईन’ चढली आहे व ते सरकारच्या विरोधात बोंब मारीत आहेत. राज्यात मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. एक हजार चौरस फुटपेिक्षा जास्त आकारमानाच्या सुपर मार्केट किंवा स्टोअरमध्ये वाईन विक्रीची मुभा दिल्याने राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार हा निर्णय महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करणारा आहे, असे बोंबलणे म्हणजे स्वतच्या उरल्यासुरल्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखे आहे. सरकारने हा निर्णय घेतला तो शेतकरी, फलोत्पादन करणारया कष्टकरयांना फायदा व्हावा म्हणून, राज्यातील दाक्ष बागायतदार, वाईन उद्योगास चालना मिळावी म्हणून त्यात नाक मुरडावे असे काय आहे?

बरं, देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात बसून या निर्णयास विरोध करावा हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल. पणजीतून त्यांनी सांगितले, “महाराष्ट्र मद्यराष्ट्र होऊ देणार नाही.” ज्या राज्यात फक्त दारूचेच धबधबे भाजपच्या नेतृत्वाखाली वाहत आहेत (अर्थात पर्यटन राज्यात हे व्हायचेच), त्या राज्याचे प्रभारी श्री. फडणवीस आहेत. भाजपशासित सर्वच राज्यांत दारू विक्रीसंदर्भात मवाळ धोरण का स्वीकारले आहे याचाही खुलासा महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. असे शिवसेनेन म्हंटल.